महाराष्ट्रात व्यावसायिक जाळे पसरवणाऱ्या अकोला अर्बन को-ऑप. बँकेला फसवण्याची जणू काही मालिकाच सुरू झाली असून, आता १७ व्यापाऱ्यांनी बँकेची ६४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. बँकेचे शाखाधिकारी दीपक भाटिया यांनी गुरुवारी रात्री १० वाजता कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
या बँकेत नुकताच एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. त्यात बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ओ.टी. राठी सामील आहेत. हा घोटाळा जवळपास १०० कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येते. ओ.टी. राठी पदावर असताना १९९९ ते २००० या कालावधीत १७ लोकांनी बँकेची सुमारे ६४ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप भाटिया यांनी त्या तक्रारीत केला आहे. मे. शंकर उद्योग व त्यांचे सात भागीदार व आणखी दोघांनी १२ कोटी ५० लाख, मे. संजय कॉटन कंपनीचे तीन भागीदार व आणखी दोघांनी मिळून तीन कोटी ६० लाख, मे. शंकरलाल सत्यनारायणचे भागीदार व इतर दोघांना १० कोटी ९० लाख, मे. जोशी एंटरप्रायझेसचे विनोद सत्यनारायण लोहिया व इतर दोघांनी एक कोटी, मे. एम.के. सन्सचे भागीदारासह पाच जणांनी ८२ लाख ८६ हजार ८०० रुपये, ओमप्रकाश तुळशीराम राठीसह दोघांनी १९ लाख २५ हजार, मे. रामचंद्र रामगोपालचे चार भागीदारांसह सहा जणांनी १२ कोटी दोन लाख ५० हजार, मे. नवलजी कॉटन स्पीनचे संचालकांसह १४ जणांनी एक कोटी ४४ लाख ६३ हजार ६०० रुपये, मे. कोठारी ब्रदर्सच्या चार भागीदारांसह सहा जणांनी चार कोटी ७१ लाख १७ हजार ११० रुपये, मे. नवलजी कॉटन स्पीनच्या चार भागीदार व इतर दोघांनी ५० लाख, मे. आदर्श दाल मिलचे पाच भागीदार व इतर दोघांनी चार कोटी आठ लाख, मे. गिरीश बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सचे पाच भागीदार व अन्य दोघांनी तीन कोटी ५४ लाख ४१ हजार ६०९ रुपये, मे. अनुश्री डेव्हलपर्सच्या एकूण चार भागीदारांनी चार कोटी चार लाख २२ हजार ५२३ रुपये, मे. अनुश्री डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर व आणखी दोन भागीदारांनी ६१ लाख ३ हजार ७०० रुपये, मे. कोठारी कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या एकूण सात भागीदारांनी चार कोटी सात लाख १२९२ रुपये, सचिन रमेश मुंदडा व इतर दोघांनी ६९ लाख ९९३१ रुपये, पामनदास वीरुमल व अधिक दोघांनी एक लाख ६० हजार ७६० रुपये, असे एकूण ६४ कोटींचे कर्ज अकोला अर्बन को-ऑप बँकेकडून घेतले होते, पण त्याची परतफेड न करता बँकेची त्यांनी फसवणूक केली असल्याची तक्रार बँकेचे शाखाधिकारी दीपक भाटिया यांनी शहर कोतवाली पोलिसात केली आहे. सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना कर्ज नाकारणाऱ्या या बँकेने या कर्ज बुडव्यांना सहज कर्ज कसे काय दिले, अशी विचारणा लोक करू लागले आहेत.
अकोला अर्बन बँकेची ६४ कोटींची फसवणूक
महाराष्ट्रात व्यावसायिक जाळे पसरवणाऱ्या अकोला अर्बन को-ऑप. बँकेला फसवण्याची जणू काही मालिकाच सुरू झाली
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-10-2013 at 09:18 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 64 crore fraud in akola urban bank