पोलीस भरतीसाठी घेतलेल्या मैदानी चाचणीत ६४२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. पात्र उमेदवारांची यादी पोलीस मुख्यालय, अधीक्षक कार्यालय येथे लावण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २४) या उमेदवारांची लेखी परीक्षा कल्याण मंडपम येथे घेण्यात येणार आहे. परभणी पोलीस दलातील ४१ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पात्र ठरलेल्या ६४२ उमेदवारांची परीक्षा शुक्रवारी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले नाव पोलीस मुख्यालय व अधीक्षक कार्यालयात लावलेल्या यादीत पाहावे, लेखी परीक्षेसाठी अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहावे. सर्व उमेदवारांनी बारावीनंतर घेतलेल्या शिक्षणाची कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.
परभणीत पोलीस भरती लेखी परीक्षेस ६४२ उमेदवार पात्र
पोलीस भरतीसाठी घेतलेल्या मैदानी चाचणीत ६४२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. पात्र उमेदवारांची यादी पोलीस मुख्यालय, अधीक्षक कार्यालय येथे लावण्यात आली आहे.
First published on: 24-05-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 642 candidate eligible in police recruitment written test