पोलीस भरतीसाठी घेतलेल्या मैदानी चाचणीत ६४२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. पात्र उमेदवारांची यादी पोलीस मुख्यालय, अधीक्षक कार्यालय येथे लावण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २४) या उमेदवारांची लेखी परीक्षा कल्याण मंडपम येथे घेण्यात येणार आहे. परभणी पोलीस दलातील ४१ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पात्र ठरलेल्या ६४२ उमेदवारांची परीक्षा शुक्रवारी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले नाव पोलीस मुख्यालय व अधीक्षक कार्यालयात लावलेल्या यादीत पाहावे, लेखी परीक्षेसाठी अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहावे. सर्व उमेदवारांनी बारावीनंतर घेतलेल्या शिक्षणाची कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा