डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित शिबिरात ६७ जणांनी रक्तदान केल्याची माहिती किशोर पवार यांनी दिली.
गेल्या ४ वर्षांपासून ६ डिसेंबर रोजी रा. स्व. संघाच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा सुरेश पाटील, अनिल अंधोरीकर, विनोद खरे, वैजनाथअप्पा लातुरे यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. बीएसएनएलचे अधिकारी मिलिंद कांबळे यांनी या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. शहरातील विविध भागातील स्वयंसेवकांनी स्वेच्छेने येऊन रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 67 people donate blood in the day of mahaparinirvan