जिल्ह्यातील ९७ वाळूघाटांच्या लिलावातील अपेक्षित किमतीला विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्याने येत्या १२ डिसेंबरला पर्यावरण विभागाच्या मान्यतेस अधीन राहून हिंगोलीत वाळूघाटाचा लिलाव होण्याची शक्यता आहे. लिलावातून ७ कोटींवर महसूल मिळेल, असे चित्र आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी ७७ पकी ३७ वाळूघाटांचा लिलाव होऊन १ कोटी ६२ लाख महसूल मिळाला. मात्र, गतवर्षी ४० वर घाटांचा लिलाव झाला नव्हता. काही घाटांचा लिलाव होऊन अपेक्षित महसूल मिळाला नाही. या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या वर्षी ९७ वाळूघाटांचे सरकारी किंमत ठरवून देण्याच्या मान्यतेस विभागीय आयुक्त कार्यालयात प्रस्ताव पाठविले होते. ९७ वाळूघाटांतून ७१ हजार ९०७ ब्रास वाळूसाठा उपलब्ध होणार आहे. त्याची सरकारी किंमत ७ कोटी ३२ लाख ९३ हजार ८१९ रुपये आहे. त्यास आयुक्त कार्यालयाकडून मान्यता मिळाली.
िहगोली तालुक्यात ३७, वसमत ११, कळमनुरी व सेनगाव तालुक्यात प्रत्येकी १५, औंढा नागनाथ तालुक्यात १९ या प्रमाणे ९७ वाळूघाट आहेत.
वाळूघाटाच्या लिलावातून ७ कोटींवर महसूल शक्य
जिल्ह्यातील ९७ वाळूघाटांच्या लिलावातील अपेक्षित किमतीला विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्याने येत्या १२ डिसेंबरला पर्यावरण विभागाच्या मान्यतेस अधीन राहून हिंगोलीत वाळूघाटाचा लिलाव होण्याची शक्यता आहे.
First published on: 24-11-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 cr revenue in sand auction