जिल्ह्य़ाचा बारावीचा निकाल ७०.३२ टक्के लागला असून आनंदाची बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७ टक्क्यांनी निकालात वाढ झालेली आहे. यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे. ७२.७३ टक्के मुली, तर ६८.०१ टक्के मुले  उत्तीर्ण झाले आहेत. १७ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ३० टक्क्यांच्या खाली लागला आहे.
यंदा जिल्ह्य़ातून २२ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेला बसले. यात ११ हजार ६०० विद्यार्थी, तर ११ हजार १५४ विद्यार्थिनी होत्या. त्यातून १६ हजार १ विद्यार्थी पास झाले असून निकालाची टक्केवारी ७०.३२ टक्के आहे. यंदाही मुलींनी निकालात आघाडी घेतली असून ११ हजार ११५४ विद्यार्थिनींपैकी ८ हजार ११२ विद्यार्थिनी, तर ११ हजार ६०० विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ८८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींची टक्केवारी ७२.७३, तर मुलांची ६८.०१ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या निकालाची टक्केवारी चार टक्क्याने अधिक आहे. विज्ञाने शाखेतून ७ हजार ३८४ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ४७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८७.६८ आहे. यात प्राविण्य श्रेणीत २०१ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १ हजार १४५, व्दितीय श्रेणीत ३ हजार ८९३, तर पास श्रेणीत १ हजार २३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून सर्वाधिक १२ हजार १०९ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार २०२ विद्यार्थी पास झाले असून निकालाची टक्केवारी ६९.४८ आहे. यात ११२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत पास झाले असून १ हजार २८३ विद्यार्थी प्रथम, ३ हजार ६५४ विद्यार्थी व्दितीय, तर २ हजार १५३ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेतून १ हजार ७८३ विद्यार्थ्यांपैकी १ हजार १५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ६९.२३ आहे. यात प्राविण्य श्रेणीत ३४, प्रथम श्रेणीत २९३, व्दितीय ५२०, तर तृतीय श्रेणीत २०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एमसीव्हीसी शाखेतून १ हजार ४७८ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्राविण्य श्रेणीत १८, प्रथम ३३२, व्दितीय ८४३, तर तृतीय श्रेणीत ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ७ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
गेल्या वर्षी केवळ ६३.५० टक्के, तर यावर्षी ७०.३२ टक्के निकाल लागला आहे. निकालात यंदा सावली तालुक्याने आघाडी घेतली असून ८०.९५ टक्के निकाल लागला आहे. ब्रम्हपुरी ७६.३४, नागभीड ७६.२१, चंद्रपूर ७५.१०, मूल ७३.६७, वरोरा ७०.७८, कोरपना ६९.३०, बल्लारपूर ६९.१७, सिंदेवाही ६९.१०, गोंडपिंपरी ६४.४८, जिवती ६४.२९, राजुरा ६१.७८, चिमूर ६१.७३, भद्रावती ५६.७१ व पोंभूर्णा ५७.६२ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्य़ातील सहा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात सन्मित्र कॉन्व्हेंट, चंद्रपूर, एम. कारमेल ज्यु. कॉलेज, चंद्रपूर, जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय, माऊंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मूल, सेंट मेरी ज्युनियर कॉलेज, तुकूम, स्टेला मॉरिस कॉन्व्हेंट, कोरपना यांचा समावेश आहे, तर जवळपास १७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल ३० टक्क्यांच्या आत लागला आहे, तर जनता महाविद्यालय ८२.७६, विद्या निकेतन ९७.९८, हिस्लॉप कॉलेज ९२, लोकमान्य टिळक विद्यालय ८२.६४, मातोश्री विद्यालय ८३.७०, न्यू इंग्लिश हायस्कुल ७९.१० व सरदार पटेल महाविद्यालय ५०.९१ टक्के निकाल लागला आहे.
जनता महाविद्यालयातून प्राजक्ता धनाजी निकम ही विद्यार्थिनी ९२ (५५२) टक्के गुणांसह विज्ञान शाखेत पहिली आली आहे. अमित एल. वाघमारे ९०.३ (५४२), प्रणिता वसंत बरकुल ८८.१६ (५२९), तर तन्वी प्रमोद लाड ८७.५० (५२५), कला शाखेतून भाग्यश्री भिवा आत्राम हिला ६९ टक्के गुण मिळाले आहेत. कॉमर्स शाखेत गणेश रमेश येरगुडे ५१९ गुणांसह ८६.५० टक्के गुण मिळाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांनी अभिनंदन केले. सरदार पटेल महाविद्यालयातून विज्ञान शाखेत शुभंम रामदास कोरे ८६ टक्के गुणांसह प्रथम आला,. तर कला शाखेत धोरण सुनील उज्वलकर ६१.३३ व वाणिज्य शाखेत साक्षी मोहन अलोनी ८४ टक्के गुणांसह प्रथम आले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ.जे.ए.शेख यांनी अभिनंदन केले. निकाल लागताच शहरातील इंटरनेट कॅफेवर विद्यार्थी व पालकांची अक्षरश: गर्दी झाली होती.

Story img Loader