जिल्ह्य़ातील काही गावांमध्ये एक महिन्यापूर्वी साथरोगाचे प्रमाण अधिकच वाढले. त्यामुळे अनेक गावांत आरोग्यपथक नेमण्यात आले. अजूनही ७१ ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडर उपलब्ध नाही, सुमारे ६० गावांना लाल कार्ड दिले आहे.
जिल्ह्य़ात ७११ गावे व ५६५ ग्रामपंचायती आहेत. गेल्या महिन्यात औंढा नागनाथ, आसोला, म्हाळसापूर आदी गावांमध्ये आरोग्यपथक नेमण्यात आले होते. पाणी तपासणी अहवालात १७.४६ टक्के दूषित पाणी असल्याचे आढळले.
५२ ठिकाणी २० टक्क्य़ांपेक्षा कमी क्लोरीन असलेले ब्लिचिंग पावडर असल्याचे तपासणीत आढळून आले. ३३ टक्के क्लोरीन असलेले ब्लिचिंग पावडर वापरणे गरजेचे आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ७१ गावांमध्ये अजूनही ब्लिचिंग पावडर नाही. मात्र, लोहरा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ब्लिचिंग पावडर आहे. ६० गावांना लाल कार्ड आहे. सुमारे ४७२ गावांना हिरवे कार्ड व ३३ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले आहे. लाल कार्ड दिलेल्या २१ ग्रामपंचायतींमध्ये पाणी शुद्धीकरण अनियमित असते. १९ ग्रामपंचायतींचा पाणीस्रोत परिसर अस्वच्छ, ५ ग्रामपंचायतींना नळगळती व वॉलगळती, १५ ग्रामपंचायतींत ब्लिचिंग पावडर योग्य प्रमाणात व गुणवत्तेत नाही.    

Story img Loader