प्रवासादरम्यान महिला प्रवाशांना सुरक्षिततेची हमी देण्याच्या दृष्टीकोनातून रेल्वे सुरक्षा दलात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जाणीवपूर्वक पाऊले टाकली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे, दीड वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून रेल्वे सुरक्षा दलात शुक्रवारी समाविष्ट झालेली ७२ महिला कॉन्स्टेबलची नवीन तुकडी. रेल्वे सुरक्षा दलात एकूण जागांपैकी १० टक्के जागा केवळ महिलांसाठी राखीव ठेवण्याचा जो निर्णय नुकताच घेण्यात आला, त्याची अंमलबजावणी या निमित्ताने सुरू झाल्याचे दिसत आहे. महिलांची ही संपूर्ण तुकडी मध्यरेल्वेच्या सेवेत दाखल झाली आहे.
उपनगरी रेल्वेसह लांब पल्ल्याच्या बहुतांश गाडय़ांमध्ये महिलांसाठी राखीव डबा समाविष्ट असला तरी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक ते महिला पोलिसांचे पुरेसे बळ उपलब्ध नव्हते. परिणामी, महिला प्रवाशांना प्रवासात सुरक्षिततेची हमी मिळेलच, याची खात्री नसायची. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांमध्ये कधीकधी बलात्काराचेही प्रकार घडल्याची उदाहरणे आहेत. उपनगरीसह अन्य गाडय़ांमध्ये महिलांची केली जाणारी छेडछाड, ही तर नित्याची समस्या. रात्रीच्यावेळी महिलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या एकूणच पाश्र्वभूमीवर, महिला प्रवाशांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे सुरक्षा दलात महिला
रेल्वेतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी ७२ रणरागिणी सज्ज
प्रवासादरम्यान महिला प्रवाशांना सुरक्षिततेची हमी देण्याच्या दृष्टीकोनातून रेल्वे सुरक्षा दलात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जाणीवपूर्वक पाऊले टाकली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे, दीड वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून रेल्वे सुरक्षा दलात शुक्रवारी समाविष्ट झालेली ७२ महिला कॉन्स्टेबलची नवीन तुकडी.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-03-2013 at 12:26 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 72 woman constable ready for ladies security in railway