लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा सज्ज झाला असून जळगाव मतदारसंघात ३३ तर, रावेरमध्ये ४० मतदान केंद्र संवेदनशील आहेत. जळगावमध्ये १७ लाख तीन हजार ४१ तर रावेरमध्ये १५ लाख ९१ हजार ४७९ मतदार २४ एप्रिल रोजी आपला हक्क बजावणार आहेत.
जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा या विधानसभा मतदारसंघाचा तर रावेर मतदारसंघात चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर या विधानसबा मतदारसंघांचा समावेश आहे. जळगावमध्ये एक हजार ८९० तर, रावेरमध्ये एक हजार ७३१ मतदान केंद्र आहेत. जिल्हा प्रशासनाने जळगाव जिल्ह्य़ातील ७४ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे जाहीर केले आहे. त्यात जळगाव शहर (१०), जळगाव ग्रामीण (७), अमळनेर (७), एरंडोल (९), भुसावळ (१७), चोपडा (९), रावेर (९), जामनेर (४), मुक्ताईनगर (२) केंद्राचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यत ७४ मतदार केंद्रे संवेदनशील
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा सज्ज झाला असून जळगाव मतदारसंघात ३३ तर, रावेरमध्ये ४० मतदान केंद्र संवेदनशील आहेत.
First published on: 24-04-2014 at 12:06 IST
TOPICSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 74 voters centers sensitive in jalgaon