बोगस कंपनीद्वारे करण्यात आलेला  ७६ लाखांचा व्हॅट घोटाळा सांगलीत उघडकीस आला असून शनिवारी गुन्हा दाखल होताच दोघांना अटक करण्यात आली. यातील एक जण फरारी झाला असून पोलीस त्याच्या शोधात आहेत.
सांगलीमध्ये धनश्री इंटरप्रायझेज, लिमये ब्रदर्स आणि सुयोग ट्रेडर्स या नावाने तीन कंपन्या स्थापन करण्यात आल्या. एप्रिल २००७ ते मार्च २०१२ या कालावधीत या कंपन्यांच्या माध्यमातून शासनाकडून मूल्यवíधत कर म्हणजेच व्हॅटचा परतावा म्हणून शासनाकडून ७६ लाख ६ हजार रुपये या तीन कंपन्यांनी परत मिळविले.
मुळात या तिन्ही कंपन्या बोगस असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कंपन्यांनी व्हॅटच्या परताव्यासाठी दाखल केलेली बिले सुद्धा बोगस असल्याचे तपासाअंती विक्रीकर खात्याच्या लक्षात आले. त्यामुळे कोल्हापूर विभागाचे सहायक विक्रीकर आयुक्त शरच्चंद्र पाटील यांनी शनिवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात या तीन कंपन्यांच्या चालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
सुभाष गणपतराव परदेशी याने धनश्री इंटरप्रायझेज, दयानंद काशीनाथ ऐवळे याने सुयोग ट्रेडर्स व विश्व्ोश चिंतामणी लिमये  याने लिमये ब्रदर्स या नावाने बोगस कंपन्या काढून ७६ लाख ६ हजार रुपये मूल्यवíधत कराचा परतावा म्हणून रक्कम शासनाकडून मिळविली आहे. शासनाची फसवणूक केली म्हणून या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करताच सुभाष परदेशी व दयानंद ऐवळे या दोघांना तत्काळ अटक करण्यात आली. मात्र विश्व्ोश लिमये हा फरारी झाला आहे. पोलीस त्याच्या शोधात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा