दोन वर्षांपूर्वी (२०११) झालेल्या नगर परिषद निवडणुकीच्या वेळी खर्चाचा हिशेब सादर केला नाही, म्हणून जिल्ह्य़ातील ७८ उमेदवारांना ३ वर्षे अपात्र ठरविण्यात आले. यात जालना ५९, भोकरदन ४ व परतूर १५ या उमेदवारांचा समावेश आहे.
संबंधित उमेदवारांना १० दिवसांची मुदत देऊन खुलाशाच्या नोटिसा जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी पाठविल्या होत्या. ज्यांनी खुलासे सादर केले नाहीत, खर्चाची विवरणपत्रे व शपथपत्रे दिली नाहीत, अशा उमेदवारांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. विहित मुदतीत व विहित रीतीने खर्चाचे हिशेब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले नाहीत म्हणून या ७८ उमेदवारांना नगर परिषद कायद्याच्या (१९६५) कलम १६ (१ड) अन्वये पुढील ३ वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले.
एका उमेदवाराने ही नोटीस घेण्यास नकार दिला होता. त्याच्या घरावर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस डकवून पंचनामा केला. या उमेदवारालाही ३ वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले. खर्चाच्या हिशेबाची विवरणपत्रे सादर न करणाऱ्यांमध्ये निवडून आलेल्या एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा