येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर हळदीचे भाव आठ ते पंधरा हजार रुपये क्विंटल असा निघाला.
या भागात हळदीचे मुख्य पीक घेतले जाते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर हळदीचे उत्पादन होते. भुईंज, ओझर्डे, पांडे, खानापूर, कबठे, बावधन, शहाबाग, रविवारपेठ, गंगापुरी, पांडेवाडी लोहारे, शेंदूरजणे, उडतारे, पाचवड, खडकी येथे मोठय़ा प्रमाणात हळदीचे पीक घेतले जाते. सध्या वाई मार्केटयार्डवर मोठय़ा प्रमाणात हळदीची आवक सुरू असून वाई-वाठार हा हळदीचा प्रसिद्ध ब्रँड आहे. सोमवारी चौदाशे पोत्यांचे लिलाव झाले. त्यात कमीतकमी आठ हजार तर जास्तीत जास्त पंधरा हजार भाव निघाले. येथे उघड पद्धतीने लिलाव होतात. शेतकऱ्यांनी निवडून व प्रतवारी करून चांगला माल आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती मोहन जाधव यांनी केले आहे.
आणखी वाचा