कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक ऑक्टोबर २०१५ मध्ये होणार आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे कल्याण-डोंबिवली शहरांची लोकसंख्या २ लाख ३० ने वाढली आहे. पालिका हद्दीतील लोकसंख्या वाढल्यामुळे महानगरपालिका हद्दीत नव्याने ७ ते ८ प्रभाग निर्माण होतील. म्हणजे पालिकेत ७ ते ८ नगरसेवक वाढणार आहेत. या वेळी पालिकेची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग (पॅनल) पद्धतीने घेण्यात येईल, असे महापालिका सूत्राने सांगितले.
निवडणुकीची सर्वतोपरी तयारी करण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याप्रमाणे पालिकेची २०११ प्रमाणे वाढलेली लोकसंख्या, या लोकसंख्येच्या आधारे नव्याने निर्माण होणारे प्रभाग, त्यांची रचना, राखीव प्रवर्गाची संख्या, येणाऱ्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यात येणार असल्याने त्या विषयीची लोकसंख्येप्रमाणे विभागणी याविषयीची इत्थंभूत माहिती संकलित करणे. त्याचे नियोजन करून त्याप्रमाणे आगामी महापालिका निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश शासनाने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा