शहरातील राजलक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने संस्थापक अध्यक्ष डॉ. दौलतराव आहेर यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय प्रगती केली असून मार्च २०१३ अखेर बँकेला एकूण ८० लाख ३८ हजार इतका नफा झाला आहे.
मार्चअखेर बँकेचा स्वनिधी रुपये ६६७ लाख झाला असून ठेवी ९६.४८ कोटींपर्यंत पोहोचल्या आहेत. कर्ज ६३.५३ कोटी इतक्या रकमेचे आहे. बँकेने ३५.६० कोटींची गुंतवणूक केली आहे. कर्जवसुली योग्य प्रकारे असल्याने नेट एनपीएचे प्रमाण फक्त ०.५२ टक्के इतके आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने हिरावाडी, पंचवटी, नाशिक येथे बँकेला नवीन शाखा उघडण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यानुसार लवकरच पंचवटी परिसरातील ग्राहकांच्या सेवेसाठी नवीन शाखा सुरू होत असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. राहुल आहेर यांनी दिली. संचालक मंडळ एकजिनसीने काम करीत असल्यामुळे ठरविलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यात यश येत असल्याचे उपाध्यक्ष अर्जुन कठपाल यांनी नमूद केले. गेल्या वर्षांच्या मजबूत आर्थिक स्थितीमुळे संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढला असल्याने येत्या आर्थिक वर्षांसाठी १२० कोटींच्या ठेवींचे व ९० कोटी कर्जाचे उद्दिष्ट ठेवले असून ते सहज साध्य केले जाईल असे कार्यकारी संचालक बाळासाहेब मगर यांनी सांगितले. याप्रसंगी संचालकांसह मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर आहेर व सरव्यवस्थापक संपत पाटील उपस्थित होते.
महेश बँकेस ९० लाखांचा नफा
नाशिकमधील श्री महेश को-ऑपरेटिव्ह बँकेस ३१ मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत एकूण ९० लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अशोक झंवर यांनी दिली. बँकेच्या एकूण ठेवी ९९ कोटींपर्यंत झाल्या आहेत. बँकेने सर्व प्रकारच्या क्षेत्रात एकूण ५१ कोटींचा कर्जपुरवठा केला असून एकूण गुंतवणूक ४४ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. बँकेने निव्वळ एनपीए एक टक्क्यापेक्षा कमी राखण्यात यश मिळविले असून वसूल भागभांडवल रुपये २४९ लाख झाले आहे. एकूण सभासद संख्या ६१७० असून मुख्य शाखेसह पंचवटी, मालेगाव, सिन्नर, नाशिकरोड अशा पाच शाखा व सारडा संकुल, एमजीरोड, नाशिक येथे केंद्र कार्यालय कार्यरत आहे. या सर्व शाखा व केंद्र कार्यालय संगणकीकृत असल्याचे उपाध्यक्ष रामनारायण कलंत्री यांनी नमूद केले. या वेळी मानद कार्यकारी संचालक बालकिसन धूत, जनसंपर्क संचालक वसंत साळवे आदी उपस्थित होते.

Story img Loader