मनपाच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने शहराच्या गंजगोलाई भागात धडक मोहीम राबवताना ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या ९० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.
या प्लास्टिक पिशव्यांमुळे शहरात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वरवंटी ग्रामस्थांनी कचरा डेपोवर कचरा टाकण्यास विरोध दर्शविला होता. महापौर स्मिता खानापुरे, आयुक्त सुधाकर तेलंग यांनी स्वतंत्र बठका घेऊन व्यापाऱ्यांना या बाबत सूचना दिल्या होत्या. ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग विकणे व वापरणे गुन्हा आहे, हे त्यांना स्पष्ट केले होते. कॅरीबॅगमुळे प्रदूषण व कचऱ्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पुढील टप्प्यात दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल केले जातील.
स्वच्छता विभागाने मोहिमेत वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे ९० किलो कॅरीबॅग जप्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा