तालुक्यात गतवर्षी १३ वाळूघाटांच्या लिलावातून सुमारे ६५ लाख महसूल जमा झाला. या वर्षी ३३ वाळूघाटांच्या लिलावातून ९० लाखांवर महसूल अपेक्षित आहे. या वेळी ग्रामपंचायतींची मदत घेऊन वाळूमाफियांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आहे.
तालुक्यात सुमारे ३३ वाळूघाट आहेत. वाळूघाटांचा लिलाव स्वस्तात मिळावा, या साठी प्रयत्न केले जातात. प्रसंगी वाळूघाटाचा लिलाव न झाल्यास वाळूमाफियांचे फावते. वाळूचोरीचे प्रकार वाढतात. गेल्या वर्षी १३ वाळूघाटांच्या लिलावातून ६४ लाख २२ हजार ९१४ रुपये महसूल प्राप्त झाला. परंतु वाळूचोरीचे प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढले. प्रशासनाने वाळूमाफियांवर करडी नजर ठेवून सुमारे ६५ कारवाया केल्या. वाळूचोरी प्रकरणी ४ लाखांवर दंड वसूल करण्यात आला. या वर्षी अस्तित्वात असणाऱ्या ३३ वाळूघाटांचा लिलाव यशस्वी पार पाडण्याचा तहसीलचा प्रयत्न आहे. या वाळूघाटांतून ९१ लाख २३ हजार ९५३ रुपये महसूल अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासन तयारीला लागले असून ऑक्टोबरमध्ये वाळूघाटांचे लिलाव होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा