जिल्ह्य़ातील मृतावस्थेत आलेल्या पितळ उद्योगाला ऊर्जितावस्थेत आणण्याचा हेतूने भंडारा जिल्हा लघु उद्योजक संस्था आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या सामूहिक प्रयत्नाने आर्टिकल क्लस्टरची स्थापना होत असून या विकास योजनेत उद्योजकांच्या १० टक्के भागभांडवलावर शासन ९० टक्के भांडवल प्रदान करणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्य़ातील कुटीर उद्योजक, लघुउद्योजकांनी या समूह विकास योजनेचे सदस्यत्व पत्करावे   व संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दिलीप गुलरवार (९०९६४६६६१७), जिल्हा उद्योजक संस्थेचे अध्यक्ष रामबिलास सारडा (९८२२५७०२८७), तसेच समूह   विकास    योजनेचे    संयोजक    नरेश    मलहोत्रा    यांनी    केले   आहे. अधिकची    माहिती    या    तीनही    मान्यवरांकडून   प्राप्त होऊ शकते.

Story img Loader