महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्ह्य़ात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून, या साठी ९५५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
आराखडय़ाची अंमलबजावणी झाल्यास प्रत्येक गावात मागेल त्याला काम मिळू शकेल. जिल्ह्य़ाच्या दहाही तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी या योजनेंतर्गत कामाचे आराखडे तयार केले आहेत. या कामांना पंचायत समितीची मान्यता घेतली असून जि. प.च्या सर्वसाधारण सभेत त्याला मंजुरी देण्यात आली. योजनेंतर्गत सिंचन, विहीर, फळबाग, शेततळे, रोपवाटिका, वृक्षलागवड,उतारावर आडवे चर खोदणे, या शिवाय एखाद्या ग्रामपंचायतीला योग्य असे नवीन काम करावयाचे वाटले, तर त्याचाही यात समावेश होऊ शकतो. जिल्ह्य़ात सध्या ७ हजार कामे प्रगतिपथावर आहेत. ती पूर्ण करण्यास प्राधान्य दिले असून त्यानंतर आराखडय़ातील नवीन कामे हाती घेतली जातील, असे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी सांगितले.   

Story img Loader