क्रीडासंकुलाच्या प्रवेशद्वारासमोर आगरी महोत्सवाचा मागील दहा वर्षांचा इतिहास उलगडणारे साहित्य झळकवण्यात आले आहे. यात महोत्सवाला भेट देणाऱ्या विशेष व्यक्तींची छायाचित्रे, ‘लोकसत्ता’मधील बातम्यांची कात्रणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या विविध औषधांचे स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत. गॅसच्या वाढत्या किमतींमुळे विजेवर चालणाऱ्या शेगडय़ांच्या स्टॉलवरही नागरिक चांगलीच गर्दी करीत आहेत. तसेच सौर ऊर्जेवर चालणाऱ्या साहित्याचे स्टॉलही येथे आहेत. महिलांचा सहभागही यात कमी नाही. महिलांचे
आजचे कार्यक्रम
१) सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२) ७.३० वाजता प्रसिद्ध कलाकारांचा समावेश असलेला ‘उंच त्यांचा झोका’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी हास्यकवी अशोक नायगांवकर, अभिनेत्री संजीवनी जाधव, हास्यकलाकार भालचंद्र कदम आणि बाल अभिनेत्री तेजश्री वालावलकर यांची लोककवी अरुण म्हात्रे मुलाखत घेणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा