डोंबिवली येथील ‘आगरी युथ फोरम’च्या वतीने आयोजिलेला आगरी महोत्सव आता शनिवारी १ डिसेंबर ऐवजी रविवारी २ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. काही महत्त्वाच्या कारणांमुळे आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे.  २ ते ९ डिसेंबर या कालावधीत डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात हा सोहळा साजरा केला जाणार आहे. नागरिकांना या वेळी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले    आहे. अधिक माहितीसाठी         संपर्क – ९८२१६५०२५० / ९८२०६३५०९१

Story img Loader