नवी दिल्ली विधानसभेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचे नेते अरिवद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) जोरदार यश मिळविल्याने रविवारी पक्षाचे चिन्ह असलेला झाडू हातात घेऊन बिंदू चौक ते शिवाजी पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढून आनंदाला वेगळे परिमाण दिले. तसेच िबदू चौक येथे कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला.
आता दिल्ली फिर गल्ली, देश का नेता कैसा हो आम आदमी जैसा हो, झाडू लगाओ बेईमान को भगाओ, आम आदमी झिंदाबाद अशी जोरदार घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. दिल्लीतील विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमीने आपले साम्राज्य प्रस्थापित केले आहे. ही निवडणूक नसून भ्रष्टाचार विरुद्धची लढाई पक्षाने जिंकली आहे. आता जनता म्हणेल ते दिल्लीत राज्य चालणार आहे. इथून पुढे नव्या राजकीय क्रांतीसाठी कटिबद्ध रहाणार असल्याचे वक्तव्य आम आदमी पार्टीचे अध्यक्ष नारायण पोवार यांनी केले. या वेळी जयवंत पोवार, पद्माकर कापसे, प्रल्हाद भतटेवार, संजय सातपुते, नंदा पाटील यासह पक्षाचे कार्यकत्रे उपस्थित होते.
कोल्हापुरात आम आदमीची झाडूसह पदयात्रा
नवी दिल्ली विधानसभेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचे नेते अरिवद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) जोरदार यश मिळविल्याने रविवारी पक्षाचे चिन्ह असलेला झाडू हातात घेऊन बिंदू चौक ते शिवाजी पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढून आनंदाला वेगळे परिमाण दिले.
First published on: 09-12-2013 at 02:15 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam admi party walking with broom in kolhapur