ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना विरोध करत त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी नागरिकांना माहिती देणाऱ्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ठाणे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी बेदम बदडले. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचे कारण पुढे करत या पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तीन कार्यकर्त्यांना अटकही केली. त्यामुळे संतापलेल्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडत आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे, आपच्या कार्यकर्त्यांना सुरक्षा बलाचे अधिकारी मारहाण करीत होते, त्या वेळी त्यांच्यासोबत तिकीट दलालही उपस्थित होते. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या भूमिकेविषयी आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्राला पडलेला दलालांचा विळखा आणि त्या ठिकाणी सुरू असलेला तिकिटांचा काळाबाजार याविषयी आपच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण केंद्राजवळ मंगळवारपासून जनजागृती मोहीम सुरू केली होती. तिकीट मिळवण्यासाठीच्या योग्य पद्धती कोणत्या, अडचण असल्यास काय करावे, तक्रार कुठे करावी, अशी माहिती देण्यात येत असल्यामुळे रेल्वे तिकीट दलालांचे धाबे दणाणले. यावरून काही दलालांनी कार्यकर्त्यांसोबत बाचाबाचीही केली. तसेच एका दलालाने कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी कार्यकर्त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार केली होती. बुधवारी सकाळीही कार्यकर्ते पुन्हा रेल्वे स्थानकात आले आणि त्यांनी तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना विरोध करत त्यांचा पर्दापाश करण्यासाठी नागरिकांना माहिती देण्यास सुरुवात केली. त्या वेळी दलालांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरू असतानाच ठाणे रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी घटनास्थळी आले आणि त्यांनीही या मोहिमेस विरोध केला. त्यामुळे आप कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या प्रकारामुळे संतापलेल्या अधिकाऱ्यांनी रमेश वर्मा, एस.बी. खत्री आणि उन्मेष बागवे या आपच्या तिघा कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्या वेळी रेल्वे तिकीट दलालही तेथे उपस्थित होते. मारहाणीनंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत तिघा कार्यकर्त्यांना अटक केली. या प्रकाराबाबत माहिती मिळताच आपचे कार्यकर्ते ठाणे रेल्वे सुरक्षा बलच्या कार्यालयाबाहेर जमले आणि त्यांनी तेथेच आंदोलन सुरू केले. रेल्वे तिकीट दलाल आणि रेल्वे सुरक्षा बल यांचा तिकीट काळाबाजार मिलिभगत असल्याचा आरोप या वेळी आप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीष मेनन यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
Railways ATVM system attack on JTBS system
JTBS, ATVM, mumbai, railway, marathi, loksatta, loksatta news, marathi news
एटीव्हीएमवर जेटीबीएसचा हल्ला
प्रसाद मोकाशी, मुंबई<br />उपनगरी प्रवाशांना तकिीटे काढण्यासाठी रांगेत उभे राहण्यास लागू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध यंत्रणा वापरात आणल्या असल्या तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात प्रवाशांच्या मागचे रांगेचे शुक्लकाष्ठ कायमच राहिले आहे. एटीव्हीएम (अॅटोमेटीक तिकीट व्हेंडीग मशीन) यंत्रणा नादुरूस्त करून जेटीबीएस (जनसाधारण तिकीट बुकींग सेवक) द्वारे तिकीटे अधिकाधिक विकण्यात येत आहेत. सीव्हीएम बंद, एटीव्हीएम नादुरूस्त आणि जेटीबीएससाठी परत बाहेर जाणे नको यासाठी प्रवासी परत तिकीटांच्या रांगेतच उभे राहणे नाइलाजाने पसंत करत आहेत.
कोणत्याही उपनगरी रेल्वे स्थानकावरल रेल्वे प्रवाशांच्या तिकीटासाठी प्रचंड रांगा असतात. या रांगामध्ये प्रवाशांनी आपला वेळ घालवू नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उपनगरी गाडय़ांत तसेच रेल्वे स्थानकांवर सतत उदघोषणा करून एटीव्हीएमचा सढळ वापर करण्याचे आवाहन करण्यात येत असते. अनेक स्थानकांवर निवृत्त रेल्वे कर्मचारी या मशीन्सवर प्रवाशांना तिकीटे काढून देण्यासाठई उपलब्ध असतात. मात्र मध्य रेल्वेवर कुर्ला, गोवंडी, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर आदी ठिकाणी जेटीबीएस यंत्रणा मोठय़ा प्रमाणात कार्यान्वित आहे. प्रत्येक तिकीटामागे एक रुपया अतिरिक्त देऊन प्रवाशांना अशा जेटीबीएसवरून तिकीट मिळत असते. ही यंत्रणा खासगी व्यक्तींकडे रेल्वेने सुपूर्द केली आहे. कुर्ला आणि गोवंडी येथे सर्वाधिक जेटीबीएसवरून तिकीटे काढण्यात येतात असे मध्ये रेल्वेकडून सांगण्यात येते.
कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस असलेल्या चार एटीव्हीएम मशीन्स दोन आठवडे पूर्ण बंद होती. ही मशीन्स सतत बंद पडत असून जाणीवपूर्वक ही मशीन्स बंद पाडण्यात येतात. येथे जेटीबीएस यंत्रणा चालविणाऱ्या दुकानांतील काही व्यक्ती थेट प्रवाशांच्या रांगेत शिरून त्यांना जबरदस्तीने आपल्या दुकानांमधून तिकीटे खरेदी करण्यास भाग पाडतात. एटीव्हीएम मशीन्स दुरूस्त होणार नाहीत याचीही काळजी येथील लोकांकडून घेण्यात येत असते. यात काही रेल्वे कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येते. रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाकडून मात्र या मशीन्सचे संरक्षण करण्याबाबत टाळाटाळ करण्यात येते. हाच प्रकार गोवंडी आणि मानखुर्द येथेही सुरू असून जाणीवपूर्वक एटीव्हीएम बंद पाडण्यामागे नेमके काय इंगित आहे, याचा शोध घेण्याची मागणी उपनगर रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत आहे.