‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ दिवाळी अंकातर्फे दिला जाणारा ‘आरोग्य ज्ञानेश्वर’ पुरस्कार यंदा ख्यातनाम प्लॅस्टिक सर्जन डॉ. रविन थत्ते यांना प्रदान करण्यात आला. विरार येथे अलीकडेच ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. त्या कार्यक्रमात डॉ. थत्ते यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
आरोग्यविषयक साहित्यनिर्मिती अथवा पत्रकारिता करणाऱ्यांना दरवर्षी ‘आरोग्य ज्ञानेश्वर’ पुरस्कार देण्यात येतो. डॉ. रविन थत्ते यांनी आरोग्य तसेच अन्य विषयांवर विशेषत: ज्ञानेश्वरीवर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे. जगभरातील मान्यवर वैद्यकीय नियतकालिकांमध्येही त्यांचे भरपूर शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. विरार येथील विवा महाविद्यालयात मागील शुक्रवारी झालेल्या ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ प्रकाशन सोहळ्यात डॉ. थत्ते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी अंकाचे संपादक डॉ. हेमंत जोशी, डॉ. अर्चना जोशी, डॉ. राजेंद्र आगरकर व डॉ. रेणुका जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेणुका जोशी यांनी केले.
डॉ. रविन थत्ते यांना आरोग्य ज्ञानेश्वर पुरस्कार
‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ दिवाळी अंकातर्फे दिला जाणारा ‘आरोग्य ज्ञानेश्वर’ पुरस्कार यंदा ख्यातनाम प्लॅस्टिक सर्जन डॉ. रविन थत्ते यांना प्रदान
आणखी वाचा
First published on: 29-10-2013 at 06:32 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarogya dnyaneshwar award to dr ravin thatte