ठाणे येथे झालेल्या मुलींच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नगरच्या आरती भोसले हिने ७५ किलो वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम लढतीत आरतीने कोल्हापूरच्या अंजली धाडगे हिचा अवघ्या १० सेकंदांत नॉक आऊट करत पराभव केला. आरतीचे हे सहावे सुवर्णपदक आहे. तिने यापूर्वी पाच वेळा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक व बेस्ट बॉक्सर पुरस्कार तसेच राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले आहे.
आरती सध्या भोपाळ येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) आंतरराष्ट्रीय स्पर्धा पूर्व शिबिरात प्रशिक्षण घेत आहे. ती नगरमधील पेमराज सारडा कॉलेजची विद्यार्थिनी आहे. आरतीला जिल्हा पोलीस दलाचे प्रशिक्षक शकील शेख तसेच मदन पुरोहित, प्रा. संजय धोपावकर यांचे मार्गदर्शन आहे. ठाणे येथीलच स्पर्धेत नगरच्या शेख जेबा गफ्फार हिने कांस्यपदक मिळवले. दोघीही पोलीस मुख्यालयातील शहीद अशोक कामटे बॉक्सिंग हॉलमध्ये सराव करतात. खेळाडूंचे जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, बॉक्सिंग संघटनेचे सचिव गप्फार शेख, नगरसेवक धनंजय जाधव, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी अभिनंदन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा