टेम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पतिपत्नी जागीच ठार झाले. टेम्पोतील चार महिलाही अपघातात जखमी झाल्या. तुळजापूर तालुक्यातील इटकळजवळ सोमवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास हा अपघात घडला.
उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथून काटगावकडे येत असलेल्या दुचाकीला (एमएच २५ ९८६२) इटकळहून नळदुर्गकडे जाणाऱ्या टेम्पोने (एमएच १३ ६१७०) समोरून धडक दिली.
यात दुचाकीवरील बसवेश्वर बलभीम महाजन (वय ४८) व जगदेवी (दोघे काटगाव) हे दाम्पत्य जागीच ठार झाले. अपघातात टेम्पोतील रुकसानाबी कासीमशहा मुजावर (वय ५०), शबाना महंमद मकानदार (वय ४०), अजीमबी कासीमशहा मकानदार (वय ३८), खातूनबी बाबुशा मकानदार (वय ४५, रा. इटकळ) या चार महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भीमाशंकर महादेव नकाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पोचालक उत्तम घुले (खानापूर) याच्याविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येऊन अटक करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा