येथील पोचमार्गावर नेरजवळील उमठा येथून शेतीची कामे करून चंद्रपूर जिल्ह्य़ातील हळदी या गावी येथे परत जाताना टॅक्सची (एम.एच.१२ बी.पी ३४४१) मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमरास झाडाला धडक लागून झालेल्या अपघातात ४ जण ठार, तर १९ जण जखमी झाले.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्स रस्त्याच्या बाजूला असलेल्या िलबाच्या झाडावर आदळून हा अपघात झाला.
अपघातात तीनजण घटनास्थळीच ठार झाले तर वाटेत यवतमाळला नेत असताना एकाचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये राजू आत्माराम सातक (२५), कोमदेव लक्ष्मण भोयर (३९),जंगलू लक्ष्मण भोयर (३५), संजय पांडुरंग गोतुरे (३०) यांचा समावेश आहे.
जखमींमध्ये संगीता शालिक भोयर (२०), बालाजी सकरू भोयर (३०), दर्शना संतोष भोयर (३५), मीराबाई जंगलू भोयर (३०), अरिवद मारोती िशदे (२५), सुशीला हरिदास भोयर (४०), सिंधूबाई राजू सातक (४५), संतोष जम्मू भोयर (२५), हरिदास गणपत भोयर (२५), प्रेमीला सकरू भोयर (१९), रणजीत श्रीराम शेंडे (४३), शामराव सुखदेव भोयर (५०), संतोष गेडाम (२०), संतोष देवतळे (२१), दुर्गाताई संतोष गेडाम (१८), शालू शंकर बोबडे (२५), उषा संजय गोबरे (३२) सर्व रा. हळदी यांचा समावेश आहे.
हे सर्वजण शेतीवर मजुरीने काम करण्याकरिता गेले होते. परत गावाकडे जात असताना हा अपघात घडला. जखमींना रुंझा येथील तरुणांनी व पोलिसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.ू
टॅक्सची झाडाला धडक, ४ ठार, १९ जखमी
येथील पोचमार्गावर नेरजवळील उमठा येथून शेतीची कामे करून चंद्रपूर जिल्ह्य़ातील हळदी या गावी येथे परत जाताना टॅक्सची (एम.एच.१२ बी.पी ३४४१) मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमरास झाडाला धडक लागून झालेल्या अपघातात ४ जण ठार, तर १९ जण जखमी झाले.
First published on: 17-10-2013 at 08:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident four died and 19 injured