सायन-पनवेल महामार्गाचे सुरू असलेले रुंदीकरणाचे काम वाहनचालकांच्या जिवावर बेतत आहे. रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या कामांमुळे या ठिकाणी अपघातांना निमंत्रण मिळत आहे. सोमवारी रात्री खारघरजवळ स्वारगेट-मुंबई एस.टी. बसला झालेल्या अपघातामुळे तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी एस.टी. बसचालकाला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तुकाराम अप्पा पाटील (७७), यशोदा तुकाराम पाटील (७०) आणि अनिता शरद पाटील (४५) अशी जखमींची नावे असून त्यांना बेलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री पावणेअकराच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे एस.टी. येत असताना खारघर येथील हिरानंदानी पुलाजवळ आल्यावर कशाचा तरी जोरदार आवाज झाल्याने घाबरलेल्या बसचालक नानासाहेब कोकरे यांनी बस अचानक वळवल्याने झोपेत असलेले प्रवासी सीट, खिडकी आदीवर आदळले. यामध्ये तीन जणांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बसचा चालक कोकरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा