दिग्रस विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयाची हॅट्रिक केलेल्या शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या फाच्र्युनर वाहनाला विरुध्द दिशेने येणाऱ्या कंटेनरने (क्र.जी.जे.१२-२३४८) धडक दिल्याने पाच जण जखमी झाले. आमदार संजय राठोड हे मुंबईत आहेत. हे समजताच आमदार संजय राठोड मातोश्रीची बठक सोडून विमानाने तातडीने नागपूरला आले आणि थेट दवाखान्यात जाऊन त्यांनी उमेश हांडांच्या प्रकृतीची चौकशी केली.
हे वाहन घेऊन त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळी शिर्डी येथे दर्शनासाठी जात असतांना नेरजवळील कोलुरा येथे अपघात झाला. यात संजय राठोड यांचे यवतमाळातील मित्र उमेश हांडा, चालक शंकर श्रावण मानकर, प्रवीण वासुदेव चव्हाण, अशोक राठोड व देविदास जाधव हे जखमी झाले. अपघात घडताच कंटेनर चालक  फरार झाला. या अपघातात फाच्र्युनर गाडीचा समोरचा भाग चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच नेरचे पोलीस उपनिरीक्षक गंगाधर जगताप घटनास्थळी पोहोचून त्यांनी जखमींना यवतमाळ येथे हलविले. जखमींपकी उमेश हांडा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने नागपूरला हलविण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा