तालुक्यातील कासारभट गावात रविवारी सकाळी गुलाब मोकल (वय ४२) या महिलेवर अ‍ॅसिड हल्ला झाला. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पीडित महिलेने ज्या तिघांवर आरोप केले आहेत, ते तिघेही घटनेच्या वेळी अन्य ठिकाणी असल्याचे पुरावे समोर आल्याने पोलीस यंत्रणा ही घटना घडली की घडविली या संभम्रात पडली आहे.
गुलाब यांनी नवीन पनवेल पोलिसांना दिलेल्या तक्रारीत रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजता त्या घराच्या उंबऱ्याजवळ असताना तीन जणांनी त्यांच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकले. यानंतर काही अंतरावर उभ्या असलेल्या त्यांच्या एका साथीदारासोबत पलायन केल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात गुलाब यांनी हल्लेखोरांची नावे पोलिसांना सांगितली आहेत.
गावात चौकशी केल्यानंतर हे संशयित आरोपी घटनेदरम्यान गावाबाहेर असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी संशयित हल्लेखोरांची अधिक माहिती मिळविण्यासाठी मालवण, मुंबई येथे पथक पाठविले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे आणि त्यांचे पथक करीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा