महावितरण कंपनीने नवीन पनवेलमधील गोदामामधील जागा गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटदाराच्या कुटूंबाला मोफत राहण्यासाठी दिली होती. लोकसत्ताने याबाबत महावितरणची मोफत घर योजना, असे वृत्त महामुंबई वृत्तान्तमधून प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या २४ तासांत या कुटुंबाला ही जागा रिकामी करण्याची नोटीस आणि या जागेत वास्तव्य करुन वर्षभर फूकट वीज वापरल्याबद्दल या कंत्राटदाराला ५ हजार रुपयांचे विजबिल बजावण्यात आले आहे.
नवीन पनवेल येथील सेक्टर १२ मधील महावितरणचे गोदाम आहे. या गोदामात गेल्या २२ वर्षांपासून एक कुटुंब राहत आहे. महावितरणचे काम करत करत या कंत्राटदाराला महावितरणच्या अधिकाऱ्यांचा माणूसकीचा आश्रय मिळाला. नवीन पनवेलयेथील महावितरणचे गोदाम या कंत्राटदाराला बिनभाडय़ाचे घराच्या स्वरुपात मिळाले.    
याबाबत महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे विचारपूस केल्यावर या गोदामाची हद्द आपली नसल्याचे सांगण्यात आले. अखेर या आशयाचे वृत्त प्रसिद्ध होताच महावितरणचे कार्यकारी अभियंता दिलीप मेहेत्रे यांनी तातडीने या गोदामाची पाहणी केली.  आणि संबंधित कंत्राटदाराला २४ तासात जागा रिकामी करण्याची नोटीस आणि त्याने वापरलेल्या विजापोटी एका वर्षांचे बिल वसूली करण्यात आल्याचे मेहेत्रे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा