पावसाळ्यात गटारांची झाकणे बंदिस्त असावीत, तसेच महापालिका हद्दीतील कोणत्याही प्रभागात गटारांवरील झाकणे उघडी आढळल्यास संबंधित प्रभागातील अभियंत्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने दिला आहे.
पावसाळ्यात पाणी तुंबल्यानंतर अनेक ठिकाणी गटारांना झाकणे नसल्याने पाणी गटारातून रस्त्यावर वाहू लागते. अनेक वेळा झाकणे नसलेल्या गटारांमध्ये नागरिकांचा अपघात होतो. या दुर्घटना टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. नेतिवली टेकडी भागात झोपडय़ा मोठय़ा प्रमाणात आहेत. पावसाळ्यात या भागात भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या आपत्कालीन कक्षात २४ तास कर्मचारी, चालक, साधने तयार ठेवण्यात आली आहेत.

Story img Loader