उल्हासनगर येथील प्रभाग समिती चारमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर अनधिकृत बांधकामविरोधी पथकाने कारवाई करून हे बांधकाम जमीनदोस्त केले. सहा अनधिकृत बांधकामांवर यावेळी कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
येथील प्रभाग समिती चारमध्ये अनधिकृत बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे आल्या होत्या.
आयुक्त बालाजी खतगावकर यांनी लगेचच या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
 यावेळी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे प्रमुख युवराज भदाणे यांनी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. यावेळी या भागांतील सहा अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on illigal structure in ulhasnager