पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचे निदर्शनास येताच संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यास तातडीने निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी दिला.
दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी व कर्मचारी वर्गाची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. पोलीस उपअधीक्षक राम हाके, उपअधीक्षक माणिक पेरके, सुनील लांजेवार, निलेश मोरे यांच्यासह पोलीस निरीक्षक, ठाणे अंमलदार उपस्थित होते. दरम्यान, ऐन उन्हाळ्यात पोलीस भरती असल्याने धावण्याची चाचणी सकाळी साडेनऊपर्यंत घेण्याची सूचना त्यांनी दिली. या अनुषंगाने आवश्यक त्या सूचनाही त्यांनी केल्या.

Story img Loader