देव आनंदला जे जमले (पण शोभले नाही) ते प्रत्येक हीरोला कसे बरे जमेल? (शोभण्याचा प्रश्नच येत नाही.) आपल्या जणू नातीच्या वयासमान टीना मुनीमचाही तो ‘चॉकलेटी हीरो’ झाला. आपला हाच हट्ट त्याने अनिता अयूबपर्यंत (सौ करोड) पूर्ण केला.. शाहरूख  खान तरी ‘ओम शांती ओम’मध्ये कोवळी काकडी दीपिका पदुकोणचा ‘नायक’ म्हणून कुठे हो शोभला? दोघांच्या वयातले अंतर तिच्या भावमुद्रेत विशेषत्वाने दिसले..‘जब तक है जान’मध्ये पुन्हा तोच खेळ (की घोळ?). कतरिनासोबत तो एकदा तरी खुलायला हवा होता, पण ‘त्याने वयाच्या सत्तेचाळिशीत प्रवेश केला आहे’ सतत ‘दिसते’ त्याचे हो काय? स्वत:चे व्यक्तिमत्त्व खुलवण्याची खुबी शाहरूखकडे आहे, स्वत:च्या नको तितक्या प्रेमात पडतानाच त्याचे लक्ष आपल्या भूमिकेवर असते व अगदी नायिकेवरही असते, तरी वाटते (व पटकन जाणवणारे) वय लपवण्याची खुबी त्याच्याकडे नाही.   

Story img Loader