नव्या वर्षांच्या आगमनासोबतच नवीन गोष्टींची खरेदी होतेच. तुमच्या खरेदीमध्ये धमाल आणण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ सुरू आहे. ४ जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या या फेस्टिव्हलमध्ये खरेदीसोबतच भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ चा इतका छान मूड चालू असताना सर्वाची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशीला देखील या फेस्टिव्हलला भेट देण्याचा मोह आवरला नाही. ३० डिसेंबर रोजी स्पृहाने माहीम व दादर येथील दुकानांना भेटी दिल्या आणि या फेस्टिव्हलचा मनमुराद आनंद घेतला.माहीम येथील ‘वीणा वर्ल्ड’च्या कार्यालयापासून स्पृहाने सर्वप्रथम भेट दिली. तेथेच १९ ते २७ डिसेंबर दरम्यान जिंकलेल्या विजेत्यांना तिच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. तिला फिरण्याची प्रचंड आवड असल्यामुळे, तिने रस घेऊन त्यांच्या विविध टूर्ससंदर्भात जाणून घेतले. दादरच्या रानडे रोड येथील ‘राणेज् पर्सेस’मधील विविध प्रकारच्या हाताने बनविलेल्या, रंगकाम केलेल्या अशा विविध पर्सेस पाहून स्पृहा थक्क झाली. ‘आर्ट व्हय़ू’ या साडीच्या दुकानातील नऊवारी साडय़ा, कांजिवरम, पैठणी तसेच पार्टीसाठीचे अनारकली ड्रेस यांची विविधता पाहून तिच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
‘रिजन्सी ग्रुप’ हे या मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक आहेत. त्याशिवाय ‘जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड’ हे या फेस्टिव्हलचे सहप्रायोजक आहेत. ‘रेमंड शॉप’ हे ‘स्टायलिंग पार्टनर’, अंजली मुखर्जी यांचे हेल्थ टोटल हे ‘हेल्थ पार्टनर’, लागू बंधू आणि वामन हरी पेठे ‘प्लॅटिनम पार्टनर’ असतील. अपना बाजार, पितांबरी आणि दादर येथील पानेरी यांच्या सहकार्याने हा महोत्सव होत आहे. वीणा वर्ल्ड हे ‘ट्रॅव्हल पार्टनर’ आहेत. स्लीम अॅण्ड स्लेंडर ‘वेल बीइंग पार्टनर’ म्हणून आहेत.
त्याशिवाय टोटल स्पोर्ट्स, केम्ब्रिज रेडीमेड्स – कुलाबा, राणेज् पर्सेस, रेन्बो गारमेंट्स, रोनाल्ड फूड प्रोसेसर, विधि ज्वेलर्स, अतुल इलेक्ट्रॉनिक्स, सारी पॅलेस, परफेक्ट ऑप्टिक्स हे ‘गिफ्ट पार्टनर्स’ आहेत. या सर्वासोबतच ‘महिंद्रा गस्टो’ची टेस्ट राइड करणाऱ्यांनाही बक्षिसे मिळवण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ मिळवता येईल. ‘महिंद्रा गस्टो’ हे या फेस्टिव्हलचे ‘टेस्ट राइड पार्टनर’ आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा