कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्य़ातील ५८ शेतक ऱ्यांचा जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते उद्या (बुधवारी) महाराष्ट्र दिनी सत्कार केला जाणार आहे.
जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली, खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. पद्मसिंह पाटील व जयवंत आवळे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, आमदार दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, बसवराज पाटील, बाबासाहेब पाटील, वैजनाथ शिंदे, सुधाकर भालेराव, विक्रम काळे, सतीश चव्हाण, अॅड. त्र्यंबकदास झंवर, विनायक पाटील, चंद्रशेखर भोसले, जि.प. उपाध्यक्ष अशोक पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. दगडोजीराव देशमुख सभागृहात दुपारी २ वाजता हा सोहळा होणार आहे. शेतीचे नवनवे प्रयोग करणाऱ्या व आधुनिक तंत्राचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविणाऱ्या शेतक ऱ्यांचा सन्मान व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे, इतर शेतक ऱ्यांना प्रेरणा मिळून उत्पादन वाढीला चालना मिळावी म्हणून हा सत्कार आयोजित केला आहे.
लातुरातील ५८ शेतक ऱ्यांना आज आदर्श पुरस्कार देणार
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्य़ातील ५८ शेतक ऱ्यांचा जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते उद्या (बुधवारी) महाराष्ट्र दिनी सत्कार केला जाणार आहे.
First published on: 01-05-2013 at 01:28 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adarsh farmer award to 58 farmers in latur