प्रसंग पहिला. दुसरीचा एक विद्यार्थी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील मुख्य रस्त्यावर उभा. त्याला याबाबत विचारणा केली असता बसची वाट पाहत आहे. बाकी मित्र मागे आहेत. जागा पकडण्यासाठी पुढे आलो, असे उत्तर मिळाले.
प्रसंग दुसरा. दुपारची शाळा भरताना आणि सकाळची शाळा सुटताना शाळेच्या आवारात विद्यार्थी, पालक, वाहन चालक, शिक्षक यांची गर्दी. या गर्दीतून वाहन चालक आपल्या विद्यार्थ्यांचा शोध घेत त्यांना एका कोपऱ्यात उभे करण्यात मग्न. बाजूला हाताची घडी घालून शिक्षक मंडळी उभी. दुसरीकडे वाहने व्यवस्थित लावा असे बजावणारा सुरक्षारक्षक.
हे प्रसंग बाल विद्या प्रसारक मंडळाच्या आदर्श विद्यालयाच्या परिसरातील आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बाल विद्या प्रसारक मंडळाचे आदर्श विद्यालय शैक्षणिक क्षेत्रात नावाप्रमाणेच ‘आदर्श’ असले तरी विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिने व्यवस्थापनास अनेक उपाययोजना करण्याची गरज आहे. मंडळाच्या वास्तूत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक तसेच शिक्षणशास्त्र पदविकेचे वर्ग दोन सत्रात भरतात. विविध माध्यम तसेच विभागातून साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने संस्थेने काही वर्षांपूर्वी सत्रात दोन याप्रमाणे तीन सत्रात सहा सुरक्षा रक्षकांची नेमणूक प्रवेशव्दारावर केली आहे. संस्थेच्या आवारात प्रवेश करण्याआधी

सुरक्षा रक्षकाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. पालकांसाठी संस्थेच्या वतीने स्वतंत्र ओळखपत्र तयार करण्यात आले आहे. पालकाव्यतिरिक्त बाहेरील इतर व्यक्तींसाठी संस्थेच्या वतीने ‘गेटपास’ अनिवार्य करण्यात आला आहे. शालेय आवारातील संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सर्वाव्दारे होणारे चित्रीकरण संस्थेच्या मुख्य कार्यालयासह प्रत्येक विभागाच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयात दिसते. आणीबाणीच्या परिस्थितीशी तोंड देता यावे म्हणून प्रत्येक मजल्यावर दोन, प्रयोगशाळा, मुख्याध्यापकांची कार्यालये याप्रमाणे मिळून अग्निशमनच्या १५ नळकांडय़ा आहेत. १० ‘स्मोक डिक्टेटर’ ही बसविण्यात आले आहेत. विद्यार्थी वाहतुकीच्या दृष्टिने खबरदारी म्हणून बाहेरील वाहन चालकांचा संपूर्ण तपशील नोंदवहीत आहे. विद्यार्थी वाहतुकीसाठी शाळेच्या आठ बससह दोन व्हॅन आहेत. दुपार सत्रात शाळा भरताना तसेच सुटताना शाळेच्या अरूंद परिसरामुळे तसेच प्रवेशव्दारासमोरच वाहतुकीचा मुख्य रस्ता असल्याने खरी समस्या उद्भवते. दुपार सत्राची शाळा भरताना मुख्य प्रवेशद्वारावर दोन सुरक्षा रक्षकांसह प्राथमिकचे मुख्याध्यापक उभे राहतात. पूर्व प्राथमिक तसेच प्राथमिकचे वर्ग सोडल्यानंतर शिक्षक मुलांना शाळेच्या आवारात आणतात. विद्यार्थ्यांना रिक्षा किंवा व्हॅन चालकाच्या स्वाधीन करण्याची जबाबदारी शिक्षक घेत नाहीत. विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व रिक्षा, शालेय बसेस या मुख्य रस्त्यालगत उभ्या असतात. जर एखादा विद्यार्थी रस्ता चुकला किंवा घरी न परतल्यास संपुर्ण जबाबदारी त्याच्या शिक्षकांची असल्याचे शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर सर्व बसेस निघेपर्यंत शिक्षकांना घरी जाता येत नसल्याचे सांगण्यात आले. शिक्षकांवर या पध्दतीने दबाव आणण्यापेक्षा शाळा सुटतांना मुले संबंधितांच्या ताब्यात दिल्यावर प्रश्न सुटू शकतील. दुसरीकडे संस्थेच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यासंदर्भातील साहित्य इतरत्र पडलेले असल्याने विद्यार्थ्यांनी त्या बाजूस जाऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित आहे.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Story img Loader