गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेमार्गे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून कोकण रेल्वेच्या ४ ते ८ सप्टेंबर दरम्यान धावणाऱ्या सर्व गाडय़ा फुल्ल झाल्याने आता जायचे कसे, असा प्रश्न भाविकांना पडला आहे. आता ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव स्पेशल गाडय़ांची घोषणा कोकण रेल्वे प्रशासन करणार आहे. या गाडय़ांची घोषणा करताना प्रवाशांची संख्या विचारात घेऊन अधिक जादा गाडय़ा सोडाव्यात,  अशी मागणी ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेने रेल्वे प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Story img Loader