राजकारण, साहित्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना आदित्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. आदित्य प्रकाशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.
नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येईल. अ. भा. महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष महंत नागराजबाबा, मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे, राजन हौजवाला, अंकुशराव कदम उपस्थित राहणार आहेत. शिक्षक म्हणून आपल्या कार्याची सुरुवात करणाऱ्या गडाख यांनी पंचायत राज्य, सहकारी बँक क्षेत्र तसेच विधिमंडळात आपला ठसा उमटवला. अर्धविराम, सहवास, अंतर्वेध आदी पुस्तकांद्वारे त्यांनी साहित्य क्षेत्रातही योगदान दिले. या बद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. हा पुरस्कार समारंभ रविवारी (दि. ८) एमजीएम कॅम्पसच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन विलास फुटाणे व वर्षां फुटाणे यांनी केले आहे.

Story img Loader