महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये कायम असलेल्या सात सदस्याचे राजीनामे घेतल्यानंतर नवीन सदस्यांची निवड महासभेत करण्यात आली. काँग्रेसचे सदस्य आजच्या महासभेत अनुपस्थित असल्याने त्यांच्या पक्षाकडून कुठलेही नाव आले नाही. उन्हाळ्यात शहरात निर्माण होणारी पाणी टंचाई आणि इतर समस्या व विकास कामासंबंधी महासभेत चर्चा होण्याची अपेक्षा असताना निवडणुकीच्या धामधुमीत केवळ स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करून सभा आटोपती घेतली.
स्थायी समितीच्या नवीन आठ सदस्यांमध्ये नागपूर विकास आघाडीकडून पल्लवी शामकुळे, सुषमा चौधरी, भावना ढाकणे, हरिश डिकोंडवार, सविता सांगोळे, बहुजन समाज पक्षाकडून सागर लोखंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुनेश्वर पेठे या सात सदस्यांची निवड करण्यात आली असून त्याला सभागृहात मान्यता देण्यात आली. काँग्रेसकडून एका सदस्यांचे नाव येणे अपेक्षित होते. मात्र, विरोधी पक्षासह सर्व सदस्य अनुपस्थित असल्याने त्यांच्या सदस्यांची निवड होऊ शकली नाही. दरम्यान, स्थायी समितीच्या स्थायी समितीच्या आठ निवृत्त सदस्यांच्या जागेवर यापूर्वी नागपूर विकास आघाडीतर्फे बाल्या बोरकर, विद्या कन्हेरे, संगीता गिरे आणि ईशरत निहीद मो. जलील अंसारी, पुरोगामी काँग्रस आघाडीकडून सिंधू उईके, रवींदर कौर आणि देवा उसरे यांची निवड करण्यात आली होती. जुन्या आठ सदस्य असलेले अविनाश ठाकरे, माया इवनाते, मीना चौधरी, वंदना इंगोले आणि देवेंद्र मेहर यांनी राजीनामे दिले. शिवसेनेचे बंडू तळवेकर यांनी मात्र सदस्यत्यावाचा राजीनामा दिला नाही त्यामुळे ते कायम राहणार आहेत. काँग्रेसचे डॉ. प्रशांत चोपडा यांनी स्थायी समिती सदस्यांचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या जागी दुसऱ्या सदस्यांची निवड झाली नाही. महापौर अनिल सोले यांनी नवीन सात सदस्यांची नावे घोषित केल्यानंतर सभागृहात त्याला मंजुरी देण्यात आली.
नागपूर विकास आघाडीमध्ये असलेले अपक्ष नगरसेवक हरीश डिकोंडवार यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची स्थायी समितीमध्ये निवड करण्याला भाजपच्या काही नगरसेवकांचा विरोध होता. निवडणुकीच्या तोंडावर आपचा ताप नको म्हणून डिकोंडवार यांना विरोध केला असताना सत्ता पक्षाने डिकोंडवार यांची समितीच्या सदस्यपदी निवड केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अपक्षाची नाराजी नको म्हणून सत्तापक्षाने हा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुनेश्वर पेठे यांची यापूर्वी निवड करण्यात आली होती. बंडू तळवेकर यांना पक्षाच्या गटनेत्यांकडून राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला नाही. या संदर्भात गटनेत्या शीतल घरत यांनी सांगितले, तळवेकर यांनी सदस्यांचा राजीनामा द्यावा, असे १० फेब्रुवारीला पत्र दिले. मात्र, त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. त्यांचा राजीनामा येत नाही तोपर्यंत दुसऱ्या सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार नाही. तळवेकर यांनी राजीमाना दिला नाही तर त्यांची पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत घेण्यात आलेल्या महासभेत प्रारंभी सदस्यांची असलेली अत्यल्प अनुपस्थितीमुळे दोन वेळा सभागृह तहकूब करण्यात आले. काँग्रेसच्या सदस्यांनी बहिष्कार
टाकला असताना सत्ता पक्षाचे आणि आघाडीतील अनेक सदस्य वेळेवर पोहोचले नाही. निवडणुकीच्या कामामुळे अनेक अधिकारी आजच्या सभेला अनुपस्थित होते. त्यामुळे केवळ स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करून सभा आटोपती घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आघाडीने वचन पाळले

स्थायी समितीच्या सदस्यपदी हरिष डिकोंडवार यांची निवड करून आघाडीने आपले वचन पाळले आहे. आघाडीतील सदस्य दुसऱ्या पक्षात गेला म्हणून त्याला दुय्यम वागणूक देण्याची भाजपची संस्कृती नाही. डिकोंडवार हे आघाडीतील सदस्य असल्यामुळे त्यांची सदस्यपदी नियुक्त करण्यात आली असल्याचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी सांगितले.

आघाडीने वचन पाळले

स्थायी समितीच्या सदस्यपदी हरिष डिकोंडवार यांची निवड करून आघाडीने आपले वचन पाळले आहे. आघाडीतील सदस्य दुसऱ्या पक्षात गेला म्हणून त्याला दुय्यम वागणूक देण्याची भाजपची संस्कृती नाही. डिकोंडवार हे आघाडीतील सदस्य असल्यामुळे त्यांची सदस्यपदी नियुक्त करण्यात आली असल्याचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी सांगितले.