पंढरपूर येथील अर्बन बँकेच्या शताब्दी समारोपास आलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे भाषण चालू असताना येथील प्रसिद्ध चित्रकार, आपटे प्रशालेचे उपमुख्याध्यापक भारत गदगे यांनी काढलेले रेखाचित्र भावले अन् फोटोवर स्वाक्षरी करून गदगे यांचे कौतुक केले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना अर्बन बँकेच्या वतीने सप्रेम भेट देण्यासाठी विठु माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा हे तैलचित्र काढून बँकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी देताच त्यांनी त्या चित्राकडे आत्मियतेने पाहिल्याने गदगे यांना अपार आनंद झाला. राष्ट्रपतींनी स्वहस्ते चित्रावर स्वाक्षरी केली. अन् चित्रकाराचा सन्मान झाला. भारत गदगे यांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पंढरीत आलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अजित पवार, संगीतकार अजय-अतुल, पंडित जसराज यांची रेखाचित्रे काढली अन् सप्रेम भेट दिली. पंढरीच्या प्रसिद्ध चित्रकारास सर्वानी शुभेच्छा दिल्या.

Story img Loader