* मुख्यमंत्री उद्योजकांशी चर्चा करणार   ल्ल १५ हजार कोटींचे सामंजस्य करार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ ऑनलाईन होणार असून नवे संकेतस्थळ तयार होत आहे. १५ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार होण्याची शक्यता असून येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत यासंबंधीचे अंतिम प्रारूप तयार होईल, अशी माहिती पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न असून त्यासाठी ते स्वत: उद्योजकांशी चर्चा करणार आहेत, असे ते म्हणाले.
शहरात येत्या २५ व २६ फेब्रुवारीला ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ होणार आहे. त्याची तयारी जोमाने सुरू असून विभागीय आयुक्त बी.व्ही. गोपाल रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली समिती तयार केली आहे. एसआयडीसी, एमएडीसी, सिडको, म्हाडा आदी शासकीय यंत्रणेसह व्हीआयए व फिक्की या व्यापारी संघटनांचे तसेच वेकोलि, मॉईल, आयबीएम आदी विविध निमशासकीय संस्थांचीही मदत होत आहे. विदर्भात उद्योग स्थापन व्हावे, यासाठी पर्यटन, भौगोलिक स्थिती, जलतरण, साधन संपत्ती वगैरेंची माहिती असलेले एक ब्रोशर (माहितीपत्रक) तयार केले जाणार असून ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ डॉट कॉम’ हे नवे संकेतस्थळ तयार केले जात आहे. १५ तारखेपर्यंत हे काम पूर्ण होईल.
सामंजस्य करारासंबंधी ‘व्हीआयए’ तयारी करीत असून १५ हजार कोटी रुपयांपर्यंत सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. १५ तारखेपर्यंत त्याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होईल. मुख्यमंत्री, राज्य व केंद्र शासनाच्या विविध मंत्र्यांनाही ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’साठी आमंत्रित करण्यात आले आहे. मुंबई, दिल्ली व बंगळुरूमध्ये यासंदर्भात प्रसिद्धी केली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने उद्योजकांच्या बैठका घेतल्या जातील. उद्योजकांचा मिहान व बुटीबोरीला पाहणी दौरा होणार आहे. ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वप्न असून उद्योजकांशी ते चर्चा करणार आहेत. उद्योजकांची यादीही तयार करण्यात आली आहे. ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ हे विदर्भ विकासाच्या दृष्टीने टाकलेले पाऊल असून त्यासाठी येथील उद्योजकांनी संपूर्ण ताकदीनिशी सक्रिय होण्याची गरज पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. विभागीय आयुक्त बी.व्ही. गोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी सौरभ राव, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे व महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने पत्रकार परिषदेला उपस्थित होते.