सरकारमध्ये आम्ही बरोबरीचे सहकारी आहोत, त्यामुळे सरकारवर होणाऱ्या आरोपांचा दोघांनीही बरोबरीने मुकाबला करायचा आहे.
जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा,  दोषारोप करणाऱ्यांना जशास तसे उत्तर द्या, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला.
अजिंक्यतारा साखर कारखाना शेंद्रे सातारा येथे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ता शिबिरात अजित पवार बोलत होते. या वेळी आर. आर. पाटील, जयंत पाटील,शशिकांत िशदे, खासदार उदयनराजे भोसले, दिलीप सोपल, हसन मुश्रिफ, जितेंद्र आव्हाड,  खासदार विद्या चव्हाण, माजी खासदार निवेदिता माने आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी भास्कर जाधव होते.
पक्ष स्थापनेनंतर जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षाबरोबर आघाडी केली. त्याचा फायदा त्यांना झाला व फटका आपल्याला बसला.  लोकसभेसाठी २६व २२ चा फॉम्र्युला ठरला आहे. या निवडणुकीत त्याप्रमाणे कामाला लागा. सत्तेची सगळी केंद्रे साखर कारखाने, जिल्हा बंॅका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका ताब्यात असतानाही विधानसभेच्या व लोकसभेच्या जागा वाढल्या नाहीत,  याविषयी खडे बोल सुनावत यापुढे सवार्ंनी कामाला लागा. सरकारने व पक्षाने दुष्काळात खूप चांगले काम केले आहे. सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवा. विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत, त्याचा समाचार त्यांनी आपल्या भाषणात घेतला.
या वेळी आर. आर. पाटील, जयंत पाटील, हसन मुश्रिफ, आदींची भाषणे झाली. खासदार उदयनराजे भोसले यांनीही सरकारच्या कामाचे कौतुक केले.  अजित पवारांच्या कामाची स्तुती करायलाही ते विसरले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा