शाळेत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध विद्यार्थिनी, त्यांचे पालक व मुख्याध्यापकाने तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. अखेर त्यांना न्याय मिळाला असून विज्ञान शिक्षकाविरुद्ध जरीपटका पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रमोद मोहनलाल दोडेजा (रा. जरीपटका) हे आरोपीचे असून तो जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत २०११ ते २०१२ मध्ये विज्ञान शिक्षक होता. २० ते २५ डिसेंबर २०११ या कालावधीत शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. त्यात विद्यार्थिनींच्या नृत्य कार्यक्रमाची जबाबदारी त्याच्याकडे होती. नृत्याच्या सरावादरम्यान त्याने १२ ते १५ वर्षांच्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केले. या विद्यार्थिनींनी शाळा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली. शाळा प्रशासनाने त्याच्यावर १ मार्च २०१२ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. आरोपीने त्याच दिवशी स्वहस्ताक्षरात राजीनामा दिला. शाळा प्रशासनाने तो स्वीकारला. आरोपीने शाळा लवादाकडे नोकरीवर रुजू होण्यासंबंधी दाद मागितली. विद्यार्थिनी, त्यांचे पालक व मुख्याध्यापकाने त्याविरुद्ध उच्च व नंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थिनी, त्यांचे पालक व मुख्याध्यापकाची बाजू ग्राह्य़ मानून भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, बालकांचे लैंगिक गुन्ह्य़ातून संरक्षण कायदा २०१२च्या कलम आठ अन्वये आरोपी शिक्षकाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरोपी शिक्षकाविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा