दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी पावसाने कोल्हापूरात हजेरी लावली. लहान व मध्यम स्वरूपाच्यासरी अधून मधून कोसळत होत्या. गेल्या चोवीस तासात जिल्ह्य़ात ६.७ मि.मी. पावसाची नोंद झाली असूनसर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात पडला आहे. गगनबावडय़ातील आत्तापर्यंच्या पावसाची नोंद ३हजार मि.मी.कडे जातांना दिसत आहे. जिल्ह्य़ातील १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.    
गेल्या आठवडय़ात कोल्हापूर जिल्ह्य़ात पावसाची संततधार होती. रविवार व सोमवारी मात्र वरूणराजानेविश्रांती घेतली होती. मंगळवारी पुन्हा एकदा पावसाचे दर्शन घडले. दुपारपर्यंत पावसाची उघडीप होती.नंतर मात्र लहान व मध्यम सरी अधून मधून येत होत्या. त्यामुळे पावसाळी वातावरण कायम राहिले. सायंकाळी कांही वेळ चांगला पाऊस झाल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार यांची चांगलीच पंचायत झालीहोती.    गेल्या चोवीस तासात जिल्ह्य़ात सरासरी ६.७ मि.मी.पाऊस झाला. गगनबावडा येथे सर्वाधिक २१ मि.मी.पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत तेथे २९५१ मि.मी.पर्जन्यवृष्टी झाली आहे. अन्य तालुक्यातीलचोवीस तासातील पावसाचे प्रमाण याप्रमाणे- करवीर ३, कागल ३, पन्हाळा २, शाहूवाडी १०, हातकणंगले०.५, शिरोळ निरंग, राधानगरी ६.७, भुदरगड ११, गडहिंग्लज ४.४२, आजरा ६, चंदगड १३.३३ मि.मी.    
दरम्यान राधानगरी, तुळशी, वारणा, दुधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगांव, चिकोत्रा, जंगमहट्टी,घटप्रभा, जांबरे, कोदे या सर्व धरणातील जलसंचायामध्ये हळूहळू चांगली वाढ होत चालली आहे. तरपंचगंगा, भोगावती, कासारी, वारणा या नद्यांवरील १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.