कोयना धरण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पर्जन्यमापकांच्या विविध मागण्यांसाठी असणारे काम बंद आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू आहे. माजी आमदार शंभूराज देसाई यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करीन, असा विश्वास दिला. गेल्या १५ वर्षांपासून पर्जन्यमापकांचे काम करणाऱ्या तरुणांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. पर्जन्यमापकांनी वेतन वाढीसाठी तसेच कायमस्वरूपी काम मिळावे यासाठी अनेकवेळा निवेदने देऊन मागणी केली आहे.

Story img Loader