गत सहा दिवसांपासून बंडगरमाळ, पंचवटी टॉकीज परिसरात पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त महिलांनी रविवारी इचलकरंजीतील मुख्य रस्त्यावर तासभर रास्तारोको केला. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सुभाष देशपांडे यांनी उद्यापासून नियमित पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
प्रभाग क्रमांक १०, ११ आणि १२ या भागात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात होत्या. यातच भर म्हणजे गत सहा दिवसापासून या भागात पाणीच सोडण्यात आलेले नाही. आज रविवारी सकाळी पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याने भागातील जलकुंभात योग्य पाणीसाठा नसतानाही पाणी सोडले. पण अवघ्या १० मिनिटातच पाणी गेल्याने आधीच संतापलेल्या नागरिकांचा विशेषत: महिला वर्गाची सहनशीलता संपली आणि याचा जाब विचारण्यासाठी भागातील असंख्य महिला जलकुंभाच्या ठिकाणी गेल्या. त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्याला धारेवर धरल्याने त्याने तेथून पळ काढला. त्यामुळे आंदोलकांच्या संतापात भरच पडली. आंदोलनाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सपोनि मुकुंद कुलकर्णी, अर्चना बोदडे सहकाऱ्यांसह आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
पण संतप्त नागरिकांनी रस्त्यावर येऊन रास्तारोको करत ठाण मांडले. मुख्य रस्ताच अडविण्यात आल्याने सुमारे तासभर वाहतूक खोळंबली होती. या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर भागातील नगरसेवक महादेव गौड, सुनीता भुते यांच्यासह सुनील तोडकर, प्रशांत सपाटे, प्रकाश मोरबाळे, सुरेश भुते आदी आंदोलनस्थळी आले. त्यांनी पालिका प्रशासनाला माहिती दिल्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सुभाष देशपांडे हे सहकाऱ्यांसह त्याठिकाणी आले. त्या वेळी संतप्त महिलांनी त्यांच्यावर प्रष्टद्धr(२२४)्नाांची सरबत्ती करत चांगलेच धारेवर धरले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा