मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक व राजकीय आरक्षण मिळण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेला लढा, त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच शासनाने मराठा समाजाच्या भावना समजून लवकरात लवकर आरक्षण लागू करावे, यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र कामगार सेना, छत्रपती फाऊंडेशनसह इतर मराठा संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला.

Story img Loader