राज्य वीज वितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून कामांबाबत होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ बोल्हेगाव परिसरातील नागरिकांनी दोन्ही खात्यांच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला.
नगरसेवक दत्ता सप्रे यांच्या नेतृत्वाखाली गोपाल कृष्णन, प्रमोद मोहोळे, प्रमोद मुथ्था, विजय इंगळे, दौलत शिंदे, निलेश मंचरकर आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एन. डी. कुलकर्णी, तसेच वीज वितरण कंपनीचे शिवाजी चाफेकरंडे यांना निवेदन दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने नगर-मनमाड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण केले. त्यावर आता मोठमोठे खड्डे झाले आहेत. त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच रस्त्याचे काम करताना त्याला साईड गटार काढली नाही, त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसांत दोन्ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली. वीज वितरण कंपनीचे चाफेकरंडे यांना दिलेल्या निवेदनात बोल्हेगाव परिसरातील रोहित्रे बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. रोहित्र जळाल्यामुळे शेतकऱ्यांना विहिरींना पाणी असूनही पिकांना ते देता येत नाही, डोळ्यासमोर सर्व पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. त्यामुळे नवी रोहित्र बसवावीत, अन्यथा वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा