नगरसेवकांनी अभ्यासासाठी वेळ मागितल्याने महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प मंजुरीसाठी आज बोलवण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. आता परवा (बुधवार) ही सभा होणार आहे.
चालू आर्थिक वर्षांचे सुधारीत व येत्या आर्थिक वर्षांचे मुळ अंदाजपत्रक सादर करून मंजुरूसाठी महापौर शीला शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मनपाची विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. दहाच मिनीटात ही सभा तहकूब करण्यात आली. सुरूवातीला स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांनी ही दोन्ही अंदाजपत्रके सभेला सादर करून त्यावर मनोगत व्यक्त केले. ते संपताच बाळासाहेब बोराटे यांनी या अंदाजपत्रकांचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी केली, ती अन्य नगरसेवकांनीही लावून धरल्याने ती मान्य करीत महापौरांनी ही सभा तहकूब केली, तसेच परवा ही सभा घेण्याचे जाहीर केले.
तत्पुर्वी अंदाजपत्रकाविषयी बोलताना वाकळे यांनी मनपाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे मान्य केले. नागरिकांच्या हितासाटी करवाढ करण्यात येणार नसली तरी सहरातील सोयी-सुविधांसाठी उत्पन्न वाढवणे गरजे आहे असे त्यांनी सांगितले. जकातीऐवजी लागू करण्यात आलेल्या एलबीटीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचेही वाकळे यांनी मान्य केले. ते लक्षात घेऊनच पारगमन करात भरीव वाढ सुचवण्यात आली असून त्याद्वारे मनपाला १० ते १२ कोटी रूपयांचे वाढीव उत्पन्न मिळू शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा